ट्रेंड – 91 वर्षी 12 तास काम करणारा सुपरमॅन

कामाला वयाचे बंधन नसते असे म्हणतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे यामध्ये 91 वर्षांचे आजोबा सिंगापूरच्या विमानतळावर वॉशरूममध्ये चक्क 12 तास काम करताना दिसले आहेत. एका प्रवाशाने आजोबांची गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट लिहून सर्वांसमोर आणली आहे. आजोबांनी या वयात त्यांच्या काम करण्याच्या, फिट राहण्याच्या रहस्याबद्दल सांगितले. ते एअरपोर्टवर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काम करत असतात. अभिनेता आर. माधवन हादेखील व्हिडीओ पाहून प्रेरित झाला आहे.  त्यानेही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा भारावून गेले आहेत आणि ‘व्यायाम नाही आनंदी राहणे महत्त्वाचे असते.’ आजोबांचे भरभरून काwतुक करत आहेत.