
>> दुर्गेश आखाडे
हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेचे प्रतीक असणारे गडकिल्ले आपल्याला नेहमीच प्रेरणादायी ठरतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास हे गडकिल्ले प्रत्येक पिसांगत आहेत. त्यातूनच प्रेरणा घेऊन रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते मलदेवाडीतील एक तरुण अल्पेश सोलकर गडभ्रमंती करू लागला.शाळेत असताना गडकिल्ले पाहण्यासाठी जाणाऱया सहलीतून त्याने सर्वप्रथम गडकिल्ले पाहिले. तिथून अल्पेश सोलकरला गडकिल्ल्यांची आवड निर्माण झाली.
आजतागायत त्याने 212 गडकिल्ल्यांवर भ्रमंती केली आहे. पुचा टप्पा म्हणून त्याने आता किल्ले संवर्धन हा उपक्रम हाती घेतला आहे.त्याची सुरुवात संगमेश्वर तालुक्यातील प्रचितगडापासून केली आहे.
सुरुवातीला मोजक्या मित्रमंडळींसोबत जाणाऱया अल्पेश सोलकर याने ही गडकिल्ले भ्रमंतीची आवड तरुणांमध्ये निर्माण केली. त्याने संगमरत्न फाऊंडेशनची स्थापना करत गडकिल्ले भ्रमंतीच्या मोहिमा आखायला सुरुवात केली. गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीनंतर या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे हा विचार अल्पेशच्या डोक्यात आला. त्यासाठी त्याने नियोजन सुरू केले. प्रचितगडावर जाऊन त्यांनी साफसफाई सुरू केली. गडावर वागवत कागडावर जाण्यासाठी पायवाट तयार केली. गडावरील श्री भैरी भवानी मंदिराचा परिसर स्वच्छ केला. मंदिरात जाण्यासाठी पायऱया तयार केल्या. संगमरत्न फाऊंडेशनने पहिल्या मोहिमेत गडाचे दगडमातीने बुजलेले प्रवेशद्वार मोकळे केले. दुसऱया मोहिमेत मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला असणाऱया बुरुजाचे काम केले आहे. या सर्व मोहिमा गडप्रेमी श्रमदानातून राबवत आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात संगमरत्न फाऊंडेशन
श्री प्रचितगडावर तिसरी मोहीम राबवणार आहे. युवावर्गात गडकिल्ले पाहण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी संगमरत्न फाऊंडेशनने गडकिल्ले भ्रमंती अभ्यास मोहीम आयोजित करते.

























































