
कपूर कुटुंबाने अलीकडेच नेटफ्लिक्सवरील ‘डायनिंग विथ द कपूर्स’ या विशेष कार्यक्रमाद्वारे चाहत्यांना त्यांच्या आयुष्याची झलक दाखवली. या कार्यक्रमांतर्गत कुटुंबाने चेंबूर मधील देवनार कॉटेजच्या आठवणींनाही उजाळा दिला. कपूर कुटुंबियांनी ही देवनार काॅटेज ही वडलोपार्जित मालमत्ता २०१९ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीजला विकली.
या शोमध्ये राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांनी ही मालमत्ता विकण्यामागील कारण सांगितले. त्या म्हणाल्या, त्यांची आई कृष्णा कपूर जाण्याआधी त्यांनी मुलांना सांगितले होते की, मी गेल्यानंतर या बंगल्यात तुम्ही अडकून पडू नका. म्हणूनच कृष्णा कपूर यांनी ही मालमत्ता त्या हयात असतानाच विकण्याचा सल्ला दिला होता.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कपूर कुटुंबाने देवनार कॉटेज गोदरेज प्रॉपर्टीजला 100 कोटी रुपयांना विकले. गोदरेजने मे 2019 मध्ये सुमारे 180/200 कोटी रुपयांना आर के स्टुडिओ विकत घेतला होता. या करारावर रणधीर कपूर, रिमा जैन, रितू नंदा आणि नातवंडे निताशा आणि निखिल नंदा यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी स्वाक्षरी केली होती.
“डायनिंग विथ द कपूर्स” मध्ये , रणधीर कपूर यांनी देवनार काॅटेजबद्दल म्हणाले की, “ही मालमत्ता आमच्या कुटुंबासाठी खूप भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्वाची होती.”























































