
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात आज गदारोळाने झाली. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एसआयआरच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. एसआयआरवर चर्चा व्हावी यामागणीसाठी दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांच्या खासदारांनी घोषणाबाजी केली. याचदरम्यान गदारोळात राज्यसभेचे कामकाज सुरूच राहिले आणि दुपारी ४.४५ वाजता अध्यक्षांनी कामकाज तहकूब करण्याची घोषणा केली.
एसआयआरच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या गदारोळानंतर मंगळवारी लोकसभेचे कामकाज सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. विरोधक एसआयआर मुद्द्यावर चर्चा करण्यावर ठाम आहेत. गदारोळाच्या दरम्यान, मणिपूर जीएसटी दुसरे दुरुस्ती विधेयक, २०२५ लोकसभेने मंजूर केले.
दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाहल्याच दिवशी संसदेपासून रस्त्यांपर्यंत एसआयआरच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक दिसले. १९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या हिवाळी अधिवेशनात सरकार अणुऊर्जेसह एकूण १० नवीन विधेयके मांडू शकते.



























































