तटरक्षक दलाला ‘अमूल्य’ भेट!

गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) ने हिंदुस्थानी तटरक्षक दलाकडे आणखी एक अत्याधुनिक गस्त घालणारे जहाज ‘अमूल्य’ सोपवले आहे. आयसीजीएस अमूल्य जहाज हे 51.43 मीटर लांब आणि 330 टन वजनाचे आहे. हे जहाज अॅडवॉन्स्ड डिझाइन आणि आधुनिक टेक्नोलॉजीचे जबरदस्त उदाहरण आहे. या जहाजाची 1500 समुद्री मैल जाण्याची क्षमता आहे. यात क्रू अधिकारी आणि 35 नौदल सैनिक बसण्याची क्षमता आहे.