कोलंबोत अडकलेले 323 हिंदुस्थानी परतले

चक्रीवादळ दित्वाहमुळे श्रीलंकेतील अनेक शहरांत प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोलंबोतील विमानतळावर अडकलेले 323 हिंदुस्थानी नागरिकांना सुखरूप हिंदुस्थानात आणले आहे. सी130 विमानाने 76 हिंदुस्थानींनी हिंडला पाठवले आहे, तर 247 हिंदुस्थानी नागरिकांना केरळची राजधानी तुरुवनंतपुरमला पाठवले आहे. या चक्रीवादळाचा श्रीलंकेला जबरदस्त फटका बसला असून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 334 वर पोहोचली आहे, तर अद्याप 370 लोक बेपत्ता आहेत.