विकसित जामखेड, सुरक्षित जामखेड हवे, यासाठी जनतेने योग्य उमेदवार निवडावे; रोहित पवार यांचे आवाहन

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत जामखेडचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असताना भाजपा सरकारने विकास कामे अडवून विकास कामाची खिचडी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन नितीन बानुगडे पाटील यांनी जामखेडच्या जाहीर केले.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरात रॅली आयोजित करत सांगता सभा घेतली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते नितीन बानुगडे पाटील म्हणाले की, सध्या नगरपंचायत मध्ये बिनविरोध निवडून आलेले भाजपाचे नेते कसे आहेत. महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकीवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. तर दुसऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. भाजपाने पाणी पुरवठा योजना, सीसीटीव्ही, मंदीर पर्यटन निधी रोखला आहे. हे सरकार विकासाचे नाही तर कामे अडविणारे आहे. आमदार रोहित पवार यांच्या मुळे महाराष्ट्रात एकमेव मतदारसंघ कर्जत जामखेड आहे तिथे तीन उपजिल्हा रूग्णालय आहे. कोरोना काळात महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वाचवला तसेच आमदार रोहित पवार यांना कलाकेंद्राचे जामखेड ही ओळख पुसुन उद्योगधंदे असणारे जामखेड करावयाची होती पण सरकारने एमआयडीसी अडविली, असेही ते म्हणाले.

आमदार रोहित पवार म्हणाले की, नगरसेवक कसे हवेत विकास कामे करणारे हवेत की गुंड हवेत हे तुम्ही ठरवा. कर्जत जामखेडचे वजन संपूर्ण राज्यात वाढले आहे. मला घेरण्यासाठी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या सभा झाल्या. एवढेच नाही तर आमच्या एका कार्यकर्त्यांविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला. यामुळे आता माझ्या बरोबर कार्यकर्ते यांचेही वजन वाढले आहे. तसेच निवडणूक आयोग हा भाजपाचे ऐकत आहे. मुख्यमंत्री यांच्या सभेसाठी निवडणूक आयोगाने नियमात बदल केला आहे.

नगरपरिषद निवडणुकीत आमचे उमेदवार सर्व सामान्य आहेत तर समोरचे सावकार, मटका, गुंडागर्दी, अवैध धंदे वाले आहेत. आता जामखेड च्या विकासासाठी आपल्या अडचणी साठी तुम्ही कोणाला निवडणार सामान्य माणसाला तुम्ही हक्काने काम सांगू शकता समोरच्या उमेदवाराला काम सांगू शकत नाहीत. आपल्या ताब्यात नगरपरिषद आल्यावर आपल्याला पाणीपुरवठा, रस्ते, भूमिगत गटारे हि कामे मार्गी लावता येतील. यासाठी सर्व सामान्य उमेदवार दिले आहेत. समोर दोन नंबर वाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.