
मुंबई महानगरपालिका भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेणार असल्यामुळे 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मंगळवार, 9 डिसेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत 17 विभागांमध्ये 15 टक्के पाणीकपात केली जाणार आहे.
तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण पेंद्राला पाणीपुरवठा करणारी 2750 मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. याचा फटका ए विभाग फोर्ट परिसर, सी मुंबई सेंट्रल, डी ग्रँट रोड, जी दक्षिण वरळी, जी उत्तर विभाग दादर; पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम वांद्रे परिसर, के पूर्व, के पश्चिम कुर्ला, पी दक्षिण गोरेगाव, पी उत्तर मालाड, आर दक्षिण कांदिवली, आर उत्तर दहिसर, आर मध्य बोरिवली विभाग आणि पूर्व उपनगरातील एन घाटकोपर, एल कुर्ला आणि एस भांडुप विभाग अशा एकूण 17 प्रशासकीय विभागांना होणाऱ्या पाणीपुरवठय़ात कपात केली जाणार आहे.





























































