पार्थ पवार यांचे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण; शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंढवा येथील महार वतन जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शीतल तेजवानीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मुढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजकानी हिला बुधवारी अटक केली. तिला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकील अमित यादव यांनी  मुंढका येथील जमीन रिग्रँट झालेली नसताना, शासनाचे किंवा जिल्हाधिकारी यांचे रिग्रँटबाबत कोणतेही आदेश नव्हते. तरीही तेजवानीने  11 हजार रुपयांचा डीडी कोणत्या आधारे भरला, जमिनीच्या किमतीचा खरेदी खतामध्ये काही उल्लेख का केला नाही?, रक्कम कोणत्या मार्गाने घेतली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का?, जमिनीचे पैसे कोणत्या खात्यामध्ये घेतले?, रेडीरेकनर दराव्यतिरिक्त आणखी काही रक्कम घेतली आहे का?, यासह गुह्याच्या सखोल तपासासाठी शीतल तेजवानीला 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद केला.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासासाठी बोलावले तेव्हा तेजवानी या हजर झाला होत्या. याप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरमध्ये तेजवानी यांच्याविषयीचा उल्लेखच नाही. त्यांची या गुह्यात काहीच भूमिका नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे, असा युक्तिवाद तेजवानी यांचे वकील अजय भिसे यांनी केला. महार वतनदारातर्फे ऍड. अरुण सोनावणे यांनी बाजू मांडली. प्रथमकर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकून घेत शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल़ी

चक्कर आल्याचा दावा

तेजवानीला गुरुकारी दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर सव्वातीन वाजता युक्तिवादास सुरुवात झाली. संध्याकाळी साडेसहापर्यंत दोन्ही पक्षांचा युक्तिवाद सुरू होता. युक्तिवादादरम्यान चक्कर आल्याचे तेजवानीने सांगितले. त्यानंतर न्यायाधीशांनी तिला समोरील खुर्चीवर बसण्याची परवानगी दिली.

अमेडिया कंपनीच्या दिग्विजय पाटील यांची पोलिसांकडून चौकशी

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अमेडिया कंपनीचा भागीदार दिग्विजय पाटील याची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 1 डिसेंबरला चौकशी करून जबाब नोंदवला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीने मुंढव्यातील 40 एकर जमीन बेकायदेशीरपणे खरेदी केली होती. त्यासाठी शीतल तेजवानी हिने 272 लोकांकडून पॉवर ऑफ ऍटर्नी अमेडिया कंपनीला दिली होती. जमीन घोटाळा प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर बोपोडीतील जमीन घोटाळ्या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा खडक पोलीस ठाण्याकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने दिग्विजय पाटील याला नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 1 डिसेंबरला त्याचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला. संबंधित प्रकरणी चौकशीसाठी पुन्हा बोलावल्यास मी हजर राहीन. मात्र सध्या मला जय पवारांच्या लग्नाला परदेशात जायचे असल्याने लग्नावरून परत आल्यानंतर मी पुन्हा चौकशीसाठी येईन, असे दिग्विजय पाटील यांनी पोलिसांना सांगितले आहे.