अमेरिका आपला ‘गेम’ करत आहे; जर्मन चान्सलरचा फोन लीकमधून खळबळजनक माहिती उघड

जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांचा फओन लीक झाल्याने त्यातून खळबळजनक माहिती उघड झाली आहे. यातून युरोपियन नेत्यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील अविश्वास दिसून येत आहे. या लीक झालेल्या कॉलमध्ये जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना इशारा देत आहे.

या कॉलमध्ये मेर्झ म्हणतात, येत्या काही दिवसांत तुम्हाला अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. अमेरिका तुमच्यासोबत आणि आमच्यासोबतही गेम करत आहेत. या लीक झालेल्या कॉलमधील संभाषणामुळे युरोपियन नेत्यांची ट्रम्पबद्दलची असुरक्षितता आणि अविश्वास उघड झाला आहे. या लीक झालेल्या कॉलमध्ये युरोपियन नेते स्पष्टपणे सांगत आहेत की झेलेन्स्कीला ट्रम्पसोबत वाऱ्यावर सोडता येणार नाही. जर्मन चांसलरसोबतचा हा लीक झालेला फोन कॉल युरोपपासून अमेरिका आणि रशियापर्यंत चर्चेचा विषय बनला आहे.

डेर स्पीगलच्या अहवालानुसार आणि एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार युरोपीय नेत्यांनी युक्रेन- रशिया युद्ध संपवण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांवर अविश्वास व्यक्त केला. या खुलाशातून पाश्चात्य आघाडीतील वाढता तणाव स्पष्ट दिसत आहे. एका जर्मन वृत्तपत्राने म्हटले आहे की त्यांना सोमवारी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की आणि अनेक युरोपीय देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये झालेल्या कॉन्फरन्स कॉलच्या लेखी नोट्स मिळाल्या आहेत. एएफपीच्या वृत्तानुसार, जर्मन चान्सलर फ्रेडरिक मेर्झ आणि फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मॉस्कोसोबतच्या बॅक-चॅनल चर्चेत वॉशिंग्टन कीवच्या हितांचे रक्षण करेल का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

डेर स्पीगल मासिकानुसार, फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी कॉल दरम्यान इशारा दिला होता की, सुरक्षा हमींबाबत स्पष्टता नसताना अमेरिका युक्रेनला भूभागावरून फसवेल अशी शक्यता आहे. लीक झालेल्या कॉलनुसार, जर्मन चान्सलर फ्रेडरिक मेर्झ यांनी झेलेन्स्की यांना सांगितले की, येत्या काही दिवसांत तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे. अमेरिकन तुमच्या आणि आमच्या दोघांशीही गेम करत आहेत. संभाषणाच्या गोपनीयतेचा हवाला देत जर्मन चांसलर कार्यालयाने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.

या लीक झालेल्या नोट्समध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राजदूत, उद्योगपती स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांच्याबद्दलही नाराजी दिसून आली, जे या आठवड्यात चर्चेसाठी क्रेमलिनला आले होते. डेर स्पीगलच्या मते, फिनलँडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी सांगितले की, आम्ही युक्रेन आणि व्होलोडिमिर यांना या लोकांसोबत एकटे सोडू शकत नाही. येथे व्होलोडिमिर यांचा उल्लेख व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी आहे. त्यांच्या कार्यालयानेही या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.