
राज्यातील महायुची सरकारच्या काळात भ्रष्टाचार आणि घोटाळे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तसेच आता महायुतीतील घटक पक्षांमधील मतभेद, दुरावा उघड होत आहे. त्यांच्यात परस्परांबाबत अविश्वास आहे. फडणवीस सरकराने पार्थ पवार, मंत्री संजय शिरसाट, दादा भुसे, संजय राठोड सारख्या घपलेबाजांना राजश्रय दिला आहे. यासारखी अनेक उदाहरणे देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी फडणवीस सरकारला जबरदस्त टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारची वर्षभरातील उपलब्धी..
१. प्रचंड बहुमत तरी सत्ताधारी पक्षांचा परस्परांवर प्रचंड अविश्वास.
२. पार्थ पवार, मंत्री संजय शिरसाट, दादा भुसे, संजय राठोड सारख्या घपलेबाजांना राजश्रय.
३. लोकांची यथेच्छ धुलाई करणाऱ्या आमदारांना अभय.
४. शक्तीपीठ महामार्गाच्या…— Ambadas Danve (@iambadasdanve) December 5, 2025
याबाबत अक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दानवे यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस सरकारची वर्षभरातील उपलब्धी…१. प्रचंड बहुमत तरी सत्ताधारी पक्षांचा परस्परांवर प्रचंड अविश्वास. २. पार्थ पवार, मंत्री संजय शिरसाट, दादा भुसे, संजय राठोड सारख्या घपलेबाजांना राजश्रय. ३. लोकांची यथेच्छ धुलाई करणाऱ्या आमदारांना अभय. ४. शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून शेतीवर वरवंटा. ५. अस्मानी सुलतानी संकटात शेतकरी वाऱ्यावर. ६. शासन आपल्या दारी योजना बंद. ७. एकमेकांचे पक्ष फोडण्याची सुसाट शर्यत. ८. फलटणला महिला डॉक्टरच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या बदमाशांना अभय. ९. स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा एक आरोपी अजूनही फरार. १०. महादेव मुंडे प्रकरणात केवळ चौकशी, एसआयटीचा फार्स. ११. पेपरफुटीमुळे स्पर्धा परीक्षा रद्द केल्याचा विक्रम. १२. समुद्रातील शिवरायांच्या स्मारकाबाबत चकार चब्द नाही. १३. ‘योजनादूत’च्या माध्यमातून तरुणाईची फसवणूक. १४. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांची नावे गायब. १५. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर. अजून बरंच आहे.. घपले करण्यास घाबरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही.. अशा शब्दांत दानवे यांनी फडणवीस सरकरला टोला लगावला आहे.

























































