
आंध्र प्रदेशातील 26 वर्षीय तरुण आफ्रिकेतून बेपत्ता झाला आहे. रामचंद्रन असे या तरुणाचे नाव असून तो श्री सत्या साई जिह्यातील तालापुला मंडलचा रहिवासी आहे. गेल्या वर्षभरापासून तो आफ्रिकेत बोरवेल ऑपरेटरचे काम करत होता, परंतु 23 नोव्हेंबरपासून त्याचा संपर्क होऊ शकला नाही. रामचंद्रनचे अपहरण करून त्याला माली देशात नेण्यात आले आहे, अशी भीती त्याच्या कुटुंबीयाने व्यक्त केली.
अमेरिकेचा महासागरात जहाजावर हल्ला
अमेरिकी लष्कराने पुन्हा ड्रग्ज तस्करीचा आरोप करत पूर्वेकडील प्रशांत महासागरात एका जहाजावर हल्ला केला. या हल्ल्यात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकी लष्कराच्या आरोपानुसार, हे जहाज व्हेनेजुएलाहून अमेरिकेत ड्रग्सची तस्करी करत होती, तर व्हेनेजुएलाने सैन्य कारवाई केल्याचा आरोप केला आहे. कॅरिबियन सागर आणि पूर्वेकडील प्रशांत महासागरात करण्यात आलेली ही 22 वी कारवाई आहे.
गुगलचे वर्कस्पेस स्टुडिओ लाँच
गुगलने अखेर वर्कस्पेस स्टुडिओला अधिकृतपणे लाँच केले आहे. वर्कस्पेस फ्लॉस नावाने ओळखले जाणारे हे टूल आता जेमिनी 3 च्या पॉवरवर काम करेल. यामुळे आता थेट जीमेल, गुगल चॅट आणि ड्राईव्हसारख्या अॅप्ससोबत इंटिग्रेडेट करण्यात आले आहे. पंपनीच्या दाव्यानुसार, दररोजच्या वर्कला आता अधिक वेगाने, स्मार्टपणे आणि पूर्णपणे ऑटोमेटेड बनवण्यास मदत होईल. वर्कस्पेस स्टुडिओचे खास वैशिष्टय़ म्हणजे यात कोडिंगची कोणतीही गरज पडत नाही. गुगल अॅपमध्ये जेमिनीचे एक खास शॉर्टकट जोडले आहे.

























































