विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई  विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2026 मध्ये विविध विद्याशाखाअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत. 1 लाख 23 हजार 998 विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत. यामध्ये पदवी स्तरावरील तृतीय वर्ष बीकॉम, बीकॉम (फायनान्शिअल मार्केट) (बँकिंग अँड इन्श्युरंस) (अकाऊंटींग अँड फायनान्स) आणि बीएमएस सत्र 6 च्या परीक्षा  1 एप्रिल 2026 पासून नियोजित करण्यात आल्या आहेत.

तृतीय वर्ष बीएस्सी, बीएस्सी आयटी, बीएस्सी कम्प्युटर सायन्स, बीएस्सी बायोटेक, डेटा सायन्स सत्र 6 च्या परीक्षा 8 एप्रिल 2026 पासून नियोजित केल्या आहेत. तर तृतीय वर्ष बीए सत्र 6 ची परीक्षा 8 एप्रिल 2026 ला घेण्यात येणार आहे. बीएएमएमसी सत्र 6 ची परीक्षा 8 एप्रिल 2026 रोजी घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. त्याचबरोबर विविध विद्याशाखातील स्वयंअर्थसहाय्यित विषयांच्या परीक्षांचे नियोजित वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे.