नाताळसाठी कोकण मार्गावर 52 हिवाळी स्पेशल फेऱ्या

कोकण मार्गावर हिवाळी हंगामासह नाताळसाठी एलटीटी-करमाळी, एलटीटी- तिरुवअनंतपुरम, एलटीटी-मंगळूर स्पेशलच्या 52 फेऱ्या धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. या फेऱ्यांमुळे कोकणवासीयांसह पर्यटक सुखावले आहेत. नियमित रेल्वेगाडय़ांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

01151/01152 क्रमांकाच्या सीएसएमटी-करमाळी स्पेशलच्या 19 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत 36 फेऱ्या धावणार आहेत. सीएसएमटी येथून रात्री 12.30 वाजता सुटणारी स्पेशल त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता करमळीला पोहोचेल. करमाळी येथून दुपारी 2 वाजता सुटणारी स्पेशल पहाटे 3.45 वाजता एलटीटीला पोहोचेल. 22 डब्यांची स्पेशल दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिवी स्थानकात थांबेल.

01171/01172 क्रमाकांची एलटीटी-तिरुवअनंतपुरम स्पेशलच्या 8 फेऱ्या धावणार आहेत. 18, 25 डिसेंबर 1, 8 जानेवारी रोजी धावणारी स्पेशल सायंकाळी 4 वाजता एलटीटीहून सुटून तिसऱ्या दिवशी रात्री 11.30 वाजता तिरुवअनंतपुरम येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात 20, 27 डिसेंबर रोजी 3 व 10 जानेवारी रोजी धावणारी स्पेशल तिरुवअनंतपुरम येथून सायंकाळी 4.20 वाजता सुटून तिसऱ्या दिवशी मध्यरात्री 1 वाजता एलटीटीला पोहोचेल.