
देशभरात हिंदी भाषेची सक्ती करायला निघालेल्या भारतीय जनता पक्षाच्याच आमदाराचे हिंदीबाबतचे अज्ञान आज विधान परिषदेत उघड झाले. हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख भाजप आमदार राजहंस सिंह यांनी एका चर्चेदरम्यान केला.
क्रॉफर्ड मार्केटसंदर्भातील चर्चेत राजहंस सिंह सहभागी झाले होते. त्यांनी हिंदी भाषेत बोलायला सुरुवात केली तेव्हा विरोधी पक्षातील सदस्यांनी त्यांना मराठीत बोला अशी विनंती केली. त्यावर राजहंस सिंह संतापले. कधी कधी हिंदी पण चालू द्या, ती राष्ट्रभाषा आहे, देशाची भाषा आहे, असे ते म्हणाले. त्यावेळी हिंदीला अद्याप राष्ट्रभाषेचा दर्जा मिळालेला नाही याचे भानही त्यांना राहिले नाही.



























































