लाडक्या बहिणींसाठी पुन्हा सामाजिक न्याय, आदिवासींचा निधी वळवला

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाचे 671 कोटी 35 लाख रुपये तर आदिवासी विकास विभागाचे 549 कोटी 29 लाख रुपये वळवण्यात आले आहेत. महिला व बाल विकास विभागानेही 4882 कोटी 56 लाख दिले आहेत. विधिमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागण्यांप्रमाणे ही आर्थिक तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय विभागाचा निधी सातत्याने ‘लाडकी बहीण योजने’साठी वळवला जात आहे. त्याचा परिणाम सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.