
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आज 10 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता सवाईच्या 71 व्या महोत्सवाला सुरुवात होईल. मुपुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल या ठिकाणी 10 ते 14 डिसेंबर दरम्यान 71 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रंगणार असून कार्यक्रमस्थळी सुमारे 8 ते 10 हजार संगीत रसिकांना सामावून घेणाऱ्या भव्यदिव्य अशा मांडवाची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.



























































