
राज्यातील वसतिगृहांची अवस्था दयनीय झाली आहे. वसतिगृहातील स्वच्छतागृहे, कॅण्टिनची व्यवस्था, पाइपमधील पाण्याची गळती याची सर्व तपासणी करण्यासाठी भरारी पथकाची गरज आहे असे मत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केले. त्यावर भरारी पथकाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दिले.
राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिका उभारण्यात येत आहे, पण सध्या ही वसतिगृह भाडय़ाच्या इमारतीत आहे. त्याऐवजी सरकारने जमीन विकत घेऊन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती.
त्यावरील चर्चेत भाग घेताना आदित्य ठाकरे यांनी ही मागणी केली. आपण विद्यार्थ्यांना वसतिगृहे राहण्यासाठी देतो, पण त्यांना राहण्यासाठी व्यवस्था चांगली आहे का, असा सवाल त्यांनी या चर्चेदरम्यान सरकारला विचारला त्यावर मुलींच्या वसतिगृहात सीसीटीव्ही पॅमेरे लावले आहेत. त्याची तपासणी होते. भरारी पथकाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन इतर अतुल सावे यांनी दिले. दरम्यान, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी भाडय़ाच्या इमारतीत वसतिगृहे न चालवता प्रत्येक जिह्यात स्वतंत्र जागा शोधण्याचे काम सुरू आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.



























































