प्राडा 85 हजार रुपयांना विकणार कोल्हापुरी चप्पल

इटलीची प्राडा कंपनी कोल्हापुरी चप्पल तब्बल 85 हजार रुपयांना विकणार आहे. कोल्हापूर आणि कर्नाटकातील सीमाभागातील कारागिरांकडून दोन हजार चपलांच्या जोडय़ा बनवून घेणार आहे. या जोडय़ांची प्रति नग 800 युरोला म्हणजेच 85 हजार रुपयांना विक्री करणार आहे, अशी माहिती प्राडाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक लॉरेन्झो बर्टेली यांनी दिली. या चपलांची विक्री नव्या वर्षात म्हणजेच फेब्रुवारीपासून प्राडाच्या 40 स्टोअर्समधून आणि ऑनलाइनद्वारे केली जाणार आहे.