नितीन नबीन भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारमधील 45 वर्षीय आमदार नितीन नबीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेपी नड्डा हे 2020 पासून भाजपच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांचा कार्यकाळ 2024 साली संपला आहे, मात्र वेगवेगळय़ा निवडणुकांमुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, नितीन नबीन यांना नड्डा यांच्या जागी बढती दिली जाण्याची शक्यता आहे.