Ashes 2025 – ऑस्ट्रेलिया-इंग्लंड तिसरा कसोटी सामना, दोन्ही संघांचे खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात; कारण आलं समोर

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज (17 डिसेंबर 2025) पासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून दिवसाअखेर संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 326 धावा केल्या आहेत. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू जेव्हा मैदानात आले, तेव्हा खेळाडूंच्या दंडाला काळी पट्टी बांधण्यात आली होती. सिडनीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 12 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. सामना सुरू होण्यापूर्वी या हल्ल्यातील मृतांना खेळाडूंसह सर्वांनीच आदरांजली वाहिली.

अ‍ॅशेज कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने सध्या 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या सामन्यातही ऑस्ट्रेलियाचे पारडे जड मानले जात आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीची फळी कोसळल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी संघाचा डाव सावरला. उस्मान ख्वाजाने 126 चेंडूंमध्ये 82 धावा केल्या आणि अ‍ॅलेक्स कॅरीने 143 चेंडूंचा सामना 106 धावांची शतकीय खेळी केली. त्यामुळे दिवसाअखेर संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 326 धावा केल्या आहेत. जोफ्रा आर्चरने पहिल्या डावात सर्वाधिक 3 विकेट घेतल्या आहेत. तर ब्रायडन कर्से आणि व्हिल जॅक्स यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या तर जोश टंगने एक विकेट घेतली.

रविवारी (14 डिसेंबर 2025) ऑस्ट्रेलियासह संपूर्ण जग हादरून गेलं. सिडनी शहरातील बॉण्डी समुद्र किनाऱ्यावर यहुदी नागरिक हनुका उत्सवासाठी मोठ्या संख्येने जमा झाले होते. याच दरम्यान संधीच्या शोधात असमाऱ्या दोन दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला आणि 26 जण जखमी झाले.