
भाजप आणि शिंदे गटाने नवाब मलिक यांच्या नेतृत्वातील अजित पवार गटास महायुतीत घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे सना मलिक यांच्या नेतृत्वात मुंबई महानगर पालिका निवडणूक लढविण्याची चाचपणी अजित पवार गटाकडून केली जात आहे.
मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सना मलिक यांनी आज पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यापूर्वी अजित पवार यांनी मुंबई पालिका निवडणुका नवाब मलिक यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचे म्हटले होते. मात्र, भाजप-शिंदे गटाकडून त्यांना महायुतीत घेण्यास विरोध होत आहे. नवाब मलिक यांची कन्या आमदार सना मलिक यांच्याकडे मुंबईचे नेतृत्व देण्याचा विचार अजितदादा गट करत आहे.






























































