
आगामी टी-20 विश्वचषकाच्या अखेरपर्यंत दासुन शनाका श्रीलंकेच्या टी-20 संघाचे नेतृत्व करणार असल्याचे नवे मुख्य निवड समिती प्रमुख प्रमोदया विक्रमसिंघे यांनी स्पष्ट केले. मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्णधारपदावरून दूर करण्यात आलेला चरिथ असलंका संघात कायम असून त्याच्या सामान्य कामगिरीमुळे नेतृत्व बदल करण्यात आला आहे. तसेच श्रीलंकेने 25 खेळाडूंचा प्राथमिक संघही जाहीर करण्यात केला असून विश्वचषकानंतर संघबांधणीवर नव्याने विचार होणार आहे. दीर्घ काळानंतर निरोशन डिकवेल्लाचेही संघात पुनरागमन झाले आहे.
श्रीलंकेचा प्राथमिक संघ ः दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कमिल मिशारा, कुसल परेरा, धनंजय डिसिल्वा, निरोशन डिकवेल्ला, जनिथ लियानागे, चरिथ असलंका, कामिंदू मेंडिस, पवन रत्नायके, सहन आराच्चिगे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलालागे, मिलन रत्नायके, नुवान तुषारा, एशन मलिंगा, दुष्मंथा चमीरा, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना, दिलशन मदुशंका, महीश तिक्षणा, दुशन हेमंथा, विजयकांत वियसकांत आणि त्रावीन मॅथ्यू.




























































