
‘दितवा’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीलंकेला हिंदुस्थानने शेजारधर्माचे पालन करत विविध प्रकारे मोठी मदत केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जाफना भागातील पारांथन, किल्लीनोच्ची आणि मुल्लईतिवू या तीन शहरांना जोडणारा हा पूल अवघ्या दोन दिवसांमध्ये बांधून वाहतुकीसाठी खुला केला. चक्रीवादळामुळे या ठिकाणचा जुना पूल उद्ध्वस्त झाला होता. त्यामुळे 20 दिवसांपासून हा रस्ता बंद होता. हिंदुस्थानी सैन्याच्या अभियांत्रिकी टास्क फोर्सने अतिशय आव्हानात्मक हवामानात पूल उभारला आहे.


























































