
हिंदुस्थानच्या यूपीआय प्रणालीने जगभरात आपला डंका वाजवला असतानाच आता शेजारील देश चीनने त्याची कॉपी करत पर्यटकांच्या सुविधेसाठी एक नवीन पाऊल उचलले आहे. चीनने परदेशी पर्यटकांना डिजिटल पेमेंटची सुविधा देण्यासाठी निहाओ चायना हे अॅप लाँच केले आहे. हे अॅप खास करून चीनमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या पेमेंट समस्या सोडवण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
चीनमध्ये अलिपे आणि वीचॅट पे यांसारख्या स्थानिक प्रणालींमध्ये परदेशी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड लिंक करणे कठीण जात होते. यामुळे पर्यटकांना लहान-मोठय़ा ठिकाणी पेमेंट करताना अडचणी येत होत्या.


























































