राजस्थानच्या गावांमध्ये महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी

राजस्थानच्या जालोर जिह्यात पंचायतीने दिलेल्या निर्णयाने नवा वाद निर्माण झाला आहे. चौधरी समाजाच्या सुंधामाता पट्टी पंचायतीने 15 गावांतील लेकीसुनांना कॅमेरा असलेला मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. हा नियम येत्या 26 जानेवारीपासून लागू होणार आहे. गावांतील महिलांना साधा फोन वापरता येईल. शिकणाऱया मुलींना काही अटी-शर्ती टाकून या निर्णयातून सूट देण्यात आली आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम, शेजारच्या घरात जाताना फोन नेण्यासही बंदी करण्यात आली आहे. पंचायतीच्या या निर्णयाला आता जोरदार विरोध होत आहे.