
राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकांदरम्यान पैशांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी आयकर विभागाने 24×7 कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष आयकर विभागाच्या निवडणूक निरीक्षण यंत्रणेचा एक भाग म्हणून कार्य करेल आणि आदर्श आचारसंहिता लागू असलेल्या संपूर्ण कालावधीत कार्यरत राहील. राज्यातील जागरूक नागरिक व रहिवाशांना निवडणूक प्रचारादरम्यान बेहिशेबी रोख रक्कम, मौल्यवान वस्तू किंवा इतर प्रलोभनाबाबत माहिती देता येईल. नागरिक व्हॉट्सऍप, मोबाईल संदेश किंवा दूरध्वनीद्वारे 7738113758 या क्रमांकावर अथवा [email protected] या ई-मेल पत्त्यावर माहिती पाठवू शकतात. हा नियंत्रण कक्ष, कक्ष क्रमांक 316, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई इथे आहे.






















































