
हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या श्रीलंकेने निर्धारित 20 षटकांत 128 धावा केल्या. हिंदुस्थानकडून वैष्णवी शर्मा आणि नल्लपुरेड्डी चराणी यांनी प्रत्येकी 2-2 तर क्रांती गौड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. गोलंदाजांनी केलेल्या सांघिक खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने सहज विजय मिळवला. या विजयाचे श्रेय कर्णधार हरमनप्रीत कौरने हिंदुस्थानच्या गोलंदाजांना देत त्यांच्या खेळीला दाद दिली.































































