
जे.जे. हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी रुग्णसेवा करत असताना त्यांच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून कर्मचारी वसाहतीत कर्मचारी वर्गाला व्यायामशाळा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्यायामशाळेमध्ये डॉक्टर्स, वैद्यकीय विद्यार्थी, सफाई कर्मचार्यांपासून सर्व कर्मचारी व त्यांची मुले व्यायाम करण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहते. व्यायामशाळेच्या माध्यमातून दरवर्षी यंदाही नवयुग व्यायामशाळेच्या वतीने शनिवार, 27 डिसेंबरला ‘नवयुग श्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने होणाऱया या स्पर्धेकरिता जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवाल, सहयोगी अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांचे मोलाचे सहकार्य लाभते. तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाठी नवयुग व्यायामशाळेचे महेश वाघ, संतोष म्हाप्रोळकर, राजू पाटील, प्रसाद जेधे, महेंद्र दळवी, गणेश शिवतरकर, आयुष तांबे, अंश वाघ, पियूष लोंढे यांनी कंबर कसली असल्याची माहिती तृतीय श्रेणी संघटनेचे अध्यक्ष सुरेश तांबे यांनी दिली.






























































