
बरगडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे (साईड स्ट्रेन) इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर ऑस्ट्रेलिया दौऱयातील ऍशेस मालिकेतील उर्वरित कसोटी सामन्यांतून बाहेर पडला आहे. इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) बुधवारी दिली. याचबरोबर ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनचीही घोषणा करण्यात आली.
आर्चरच्या जागी गस ऍटकिन्सनचा संघात समावेश करण्यात आला असून 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱया बॉक्सिंग डे कसोटीत तो खेळणार आहे. निवड समितीने जेकब बेथेललाही संघात संधी दिली आहे. तो ऑली पोपच्या जागी तिसऱया क्रमांकावर फलंदाजी करेल. खराब फॉर्ममुळे पोपला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. या दौऱयात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाला झालेली ही दुसरी मोठी दुखापत आहे.
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ ः झॅक क्राऊली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), विल जॅक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, जोश टंग.





























































