New Year Celebration – 31 डिसेंबरला मद्यविक्री पहाटे 5 पर्यंत सुरु राहणार; राज्य सरकारचा निर्णय

नवीन वर्ष सुरू व्हायला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. देशभरात नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताची उत्सुकता पहायला मिळतेय. यातच राज्य सरकारने नाताळ आणि 31 डिसेंबरनिमित्त मद्यविक्री आणि बिअर बार उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने नाताळ आणि नववर्षानिमित्त 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी राज्यातील विविध मद्य विक्रीची दुकानं आणि बिअर बार निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

  • एफएल- 2 (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचं दुकान) रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी
  • उच्च दर्जाची आणि अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेली एफएल- 2 ला रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत परवानगी
  • एफएलडब्ल्यू 2 आणि एफएलबीआर 2 ला रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत मंजुरी
  • एफएल 3 (परवाना कक्ष) आणि एफएल 4 (क्लब अनुज्ञप्ती) यांना पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत आणि
    पोलीस आयुक्तालयच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत मंजुरी आहे.
  • नमुना ई (बीअर बार) आणि ई-2 यांना मध्यरात्री 12 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी
  • सीएल 3 ला महानगरपालिका तसंच ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत आणि इतर ठिकाणी रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत मंजुरी आहे.