राहुल गांधींवर परदेशात पाळत ठेवली जाते, सॅम पित्रोदांचा केंद्र सरकारवर आरोप

राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान हिंदुस्थानी दूतावासाकडून त्यांच्यावर पाळत ठेवली जाते आणि अनेक वेळा परदेशी नेत्यांना त्यांना भेटू नये असे सांगितले जाते, असा आरोप ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा एनबी केंद्र सरकारवर केला आहे. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे.

राहुल गांधी यांच्या जर्मनी दौऱ्याच्या टाईमिंगवरून भाजपच्या आरोपांना प्रश्न सॅम पित्रोदा यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की, “परदेश दौरे हे अचानक ठरले नसून काही महिने आधीच नियोजित केलेले असतात.” पित्रोदा म्हणाले की, “या दौऱ्याचा मुख्य उद्देश प्रोग्रेसिव्ह अलायन्सची बैठक होती, ज्यामध्ये सुमारे ११० देशांतील लोकशाही पक्षांचा समावेश आहे. हिंदुस्थानसारख्या मोठ्या देशात नेहमीच काहीतरी महत्त्वाचे घडत असते. संसदेत असो किंवा देशात, वेळेबाबतचे प्रश्न नेहमीच उद्भवतील.”

राहुल गांधी यांनी परदेशात हिंदुस्थानविरोधी विधाने केल्याच्या आरोपांना सॅम पित्रोदा म्हणाले म्हणाले, “आजच्या जगात, तुम्ही हिंदुस्थानात जे बोलता ते आंतरराष्ट्रीय स्तरावर जाते आणि तुम्ही परदेशात जे बोलता ते राष्ट्रीय स्तरावर पोहोचते. सत्य हे देशात बोलले जात असो किंवा परदेशात, सत्य हे सत्य असते. याचे कोणतेही दुहेरी निकष असू शकत नाहीत.”