
नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 16 दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या ताज्या कामकाज पॅलेंडरनुसार, पुढील महिन्यात 4 रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवारव्यतिरिक्त 10 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी बँका बंद राहतील.
तुम्ही बँकांच्या सुट्टय़ा असूनही ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैशांचे व्यवहार किंवा इतर कामे करू शकता. या सुविधांवर बँकांच्या सुट्टय़ांचा कोणताही परिणाम होणार नाही.
अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर या सुट्टय़ा लक्षात ठेवाव्या लागतील. येथे पहा जानेवारी 2026 मध्ये तुमच्या राज्य किंवा ठिकाणी बँका कधी-कधी बंद राहतील..
कोणत्या दिवशी बँका बंद
n 1 जानेवारी ः नवीन वर्ष दिवस – आयझॉल, चेन्नई, गंगटोक, इंफाळ, इटानगर, कोहिमा, कोलकाता, शिलाँग येथे बँका बंद.
n 2 जानेवारी ः नवीन वर्षाचे उत्सव/मन्नम जयंती – आयझॉल, कोची, तिरुवनंतपुरम.
n 3 जानेवारी ः हजरत अली यांचा जन्मदिन – लखनऊ येथील बँका बंद.
n 12 जानेवारी ः विवेकानंद जयंती – कोलकाता.
n 14 जानेवारी ः मकरसंक्रांती/बिहू – अहमदाबाद.
n 15 जानेवारी ः उत्तरायण शुभ काळ/पोंगल/माघे संक्रांती/मकरसंक्राती – बंगळुरू, चेन्नई, गंगटोक, हैदराबाद, विजयवाडा.
n 16 जानेवारी ः तिरुवल्लुवर दिवस – चेन्नई.
n 17 जानेवारी ः उझावर थिरुनल – चेन्नई.
n 23 जानेवारी ः सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस/
सरस्वती पूजा (श्री पंचमी)/बसंत पंचमी – आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता.
n 26 जानेवारी ः प्रजासत्ताक दिन ः भोपाळ, चंदिगड, डेहरादून, कानपूर, श्रीनगर वगळता सर्वत्र.
शेअर बाजारातही 9 दिवस ट्रेडिंग बंद
जानेवारी 2026 मध्ये शेअर बाजारात 9 दिवस ट्रेडिंग होणार नाही. बीएसईच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 4रविवार आणि 4 शनिवारव्यतिरिक्त 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्रेडिंग बंद राहील.


























































