पुण्यात पोलिसांची धडक कारवाई, एक कोटी पेक्षा अधिक रक्कम आणि लाखो रुपयांची दारू जप्त

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील काकडे वस्ती, गल्ली क्रमांक 2 येथे आज एपीआय अफरोज पठाण आणि गुन्हे शोध पथकाने केलेल्या दारूबंदी (प्रोहीबिशन) कारवाईत मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त करण्यात आली. या कारवाईदरम्यान 50 एमएलचे 80 पाउच, विविध ब्रँडची देशी व विदेशी दारू, व्हिस्कीचे मोठ्या प्रमाणावर नग, तसेच 70 लिटर दारूचे कॅन असा एकूण 2,05,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय 1,41,050 रुपयांची रोख रक्कम मिळून एकूण 3,46,950 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

अमर कौर उर्फ मद्रीकौर दादासिंग जुनी, दिलदार सिंग दादासिंग जुनी आणि देवाश्री जुनी सिंग हे अवैध दारू विक्री करत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या ताब्यातील रक्कम मिळाल्यानंतर राहत्या घराची झडती घेतली असता बेडरूममधील कपाटातील विविध कप्प्यांत ठेवलेली 1 कोटी 85 हजार 950 रुपयांची रोख रक्कम आढळून आली. संपूर्ण रकमेसह दारूसाठ्याचा पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आरोपींकडून सापडलेला मुद्देमाल

1. 50 एम एल चे 80 फुगे – 1600 रुपये
2. 35 मीटरचे दोन कॅन एकूण 70 लिटर – 28000
3. नंबर 1 व्हिस्की 220 नग -48,400
4. आयबी व्हिस्की 183 नग -40,260
5. आर एस 180 ml 224 नग – 56,000
6. आर एस 90 ml 20 नग – 2,800
7. क्लासिक गोल्ड 32 नग – 4,800
8. Volkan ब्लू 38 नग – 6,080
9. डर्बी स्पेशल 43 नग – 6,880
10. ओल्ड मंक रम 48 नग – 10,320
11. टॅंगो पंच 77 नग -6,160