कंपनी विकल्यावर सीईओने कर्मचाऱ्यांना वाटले दोन हजार कोटी रुपये

अमेरिकेत लुईझियाना येथील ‘फायबरबॉन्ड’ कंपनीच्या मालकाने कंपनी विकून आपल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी लाखो डॉलर्सचे बोनस चेक दिले. ही रक्कम थोडी थोडकी नसून तब्बल 240 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. या मालकाने आपली कंपनी 1.7 अब्ज डॉलर्सना विकल्यानंतर हा उदारपणा दाखवला. सोशल मीडियावर या कंपनीच्या मालकावर काwतुकाचा वर्षाव होत आहे.

फायबर बॉण्डचे आता माजी सीईओ असलेले ग्रॅहम वॉकर यांनी सांगितले की, जर संभाव्य खरेदीदार ‘इटन’ने विक्रीच्या रकमेपैकी 15 टक्के रक्कम कर्मचाऱयांसाठी राखून ठेवली नसती, तर त्यांनी कंपनी विकण्यास सहमती दर्शवली नसती. या वर्षीच्या सुरुवातीला जेव्हा इटनने फायबर बॉण्डचे अधिग्रहण केले, तेव्हा हा करार पूर्ण झाला. यामुळे 540 पूर्णवेळ असलेल्या कामगारांना बोनस म्हणून काही ठराविक रक्कम देण्यात आली. सरासरी प्रत्येक कामगाराला पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे 4 लाख 43 हजार डॉलर्स मिळाले.