
आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात सलगच्या सुट्टय़ांमुळे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने 2 जानेवारीपर्यंत व्हीआयपी दर्शनसेवा बंद ठेवण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयांना असलेल्या नाताळ, वर्षअखेरीच्या सुट्टय़ांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून मोठय़ा संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे शहर गर्दीने फुलून गेले असून, त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी पाच ते सहा तासांचा वेळ लागतो. बॅरिकेडिंग करूनही गर्दी नियंत्रणात आणण्यात अडचणी आल्या. सध्या येथे पहाटे साडेपाचपासून रात्री साडेनऊपर्यंत मंदिर खुले असते, वाढती गर्दी लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्टने व्हीआयपी दर्शन सेवा 2 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.































































