
आयकर खात्याने अनेक करदात्यांना त्यांचा आयकर परतावा थांबविण्याचा मेसेज आणि ई-मेल पाठविला तर घाबरू नका. काही प्रक्रिया केल्यास परतावा मिळतो.
विवरण आणि टीडीएस या तपशिलात काहीतरी जुळत नाही. त्यामुळे सिस्टममध्ये परतावा थांबवला जातो. करदात्याकडून झालेली चूक सुधारण्याची ही संधी असते.
सर्वप्रथम आपले प्राप्तिकर विवरण तपासून घ्या. फॉर्म 26 एएस, एआयएस किंवा टीआयएस यामधील माहिती विवरणासोबत पडताळून घ्या.
सुधारित विवरण फाईल करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे केवळ पाच दिवसच यासाठी उरले आहेत. त्यानंतर आयटीआर-यू दाखल करावा लागेल.
आयटीआर-यूमध्ये कर परताव्याचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे चूक दुरुस्त करून लवकरात लवकर सुधारित विवरण दाखल करा. गरज भासल्यास तज्ञांची मदत घ्या.
































































