
अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. एआयच्या मदतीने सोशल मीडियावर मॉर्फ केलेले फोटो, व्हिडीओ तयार केल्याप्रकरणी हायकोर्टात धाव घेत शिल्पा शेट्टी हिने याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना फोटो व व्हिडीओ हटवण्याचे आदेश दिले आहेत.
अभिनेत्रीच्या छायाचित्राचा वापर करत परवानगीशिवाय साड्या व इतर उत्पादने विकल्याप्रकरणी शिल्पा शेट्टी हिने अॅड. सना रईस खान हिच्या मार्फत याचिका दाखल केली होती. अशा पद्धतीने फोटो व व्हिडीओ वापरल्याने कॉपीराईट कायद्याचे, गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला.































































