
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी नुकताच मिनी लिलाव पार पडला. या लिलावानंतर स्पर्धेचे वेध लागलेले असतानाच मुंबई इंडियन्सच्या माजी गोलंदाजाची विकेट पडली आहे.

मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज आकाश मधवाल हा बोहल्यावर लढला असून त्याने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

आकाश मधवाल याने प्रियसी सुमन नौटियाल हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

रविवारी कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आकाश आणि सुमन या दोघांचा 26 सप्टेंबर 2025 रोजी साखरपुडा झाला होता. दोघांनीही आपापल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते.

आकाश मधवाल याने 2023 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

दुबईत नुकत्याच झालेल्या लिलावामध्ये तो अनसोल्ड राहिला होता. त्याच्यावर एकाही संघाने बोली लावली नव्हती.


























































