पुतीन यांना घरातून उचलण्याची गरज नाही – ट्रम्प

व्हेनेझुएलाचे माजी अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याप्रमाणेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना घरातून ताब्यात घेण्याची चर्चा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावली आहे. ‘‘तसे काही करण्याची गरज वाटत नाही,’’ असे ट्रम्प म्हणाले.

मादुरो यांच्यानंतर पुतीन हे पुढचे लक्ष्य असतील अशी उपरोधिक टिप्पणी ट्रम्प यांनी केली होती. त्याबाबत ट्रम्प यांना पत्रकारांनी विचारले असता, ‘‘असे काही करण्याची गरज लागणार नाही. रशियाशी आमचे संबंध नेहमीच उत्तम राहिले आहेत आणि यापुढेही राहतील,’’ असे ट्रम्प म्हणाले. ‘‘मी जगातील आठ युद्धे थांबवली. यात युक्रेन-रशियाचीही भर पडेल असे वाटले होते. मला हे सहज करता येईल असेही वाटले होते. मात्र अद्याप हे युद्ध सुरू आहे. त्यामुळे मी खूप निराश झालो आहे,’’ असे ट्रम्प या वेळी म्हणाले.