
दोन शतकी भागीदारींच्या जोरावर भारत क्रिकेट क्लबने ग्लोरियस क्रिकेट क्लबचा सात विकेट राखून पराभव करत महिला लीग क्रिकेट स्पर्धेत आपली विजयी आगेकूच कायम राखली. ग्लोरियस संघाच्या 244 धावांचा पाठलाग करताना धनश्री वाघमारे, आचल वाळुंज आणि केतकी धुरेने दमदार अर्धशतकी खेळी करत संघाला 3 बाद 245 धावसंख्येसह संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला.
सुरुवातीला इरा जाधव आणि निव्या आंब्रेने नाबाद राहत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. इराने नाबाद 122 आणि निव्याने नाबाद 75 धावा करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. साध्वी संजयने 42 धावांचे योगदान दिले. या डावातील एकमेव विकेट लाजरी भोवरने मिळवली.
धावांचा पाठलाग करताना भारत क्रिकेट क्लबची सुरुवात खराब झाली. सलामीची जोडी लगेच फुटल्यावर धनश्री आणि आचलने 112 धावांची भागीदारी करत संघाला विजयाची आस दाखवली. त्यानंतर आचलने 99 धावा बनवत केतकीसह 128 धावांची दुसरी शतकी भागीदारी रचत संघाला विजय मिळवून दिला.




























































