जळगावमध्ये तरुणाला बोगस मतदान करताना पकडले, संतप्त नागरिकांनी दिला चोप

राज्यातल्या 29 महानगरपालिकांसाठी आज निवडणुक होत असून सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे, अशातच अनेक ठिकाणी मतदानातील बोगसगिरी समोर आली आहे. जळगावमध्ये एका तरुणाला बोगस मतदान करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. वांरवार आवाहन करुन अशाप्रकारच्या घटना होत असल्याने नागरिकही चांगलेच संतापले आणि त्यांनी त्या तरुणाला चांगलाच चोप दिला आहे. यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे तरुण थोडक्यात बजावला असून याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.