मतदानात घोटाळे करायचे त्यांनी ते केले आहेत, संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या रणधुमाळीनंतर आता निकालाचा दिवस उजाडला आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी (16 जानेवारी)  माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मुंबईतील जनतेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदश्चंद्र पवार) या आमच्या युतीला मतदान केलेले आहे. जनतेने मतदान केले. या मतदानात घोटाळे करायचे त्यांनी केले आहेत. शाई पुसली गेली आहे… मतमोजणी सुरु होऊ दे आमचं त्यावर लक्ष असणार आहे.