तिथून ‘भाजपच्या एकनाथ शिंदे’ यांच्या बाजूने न्यायाचा तराजू झुकत गेला, महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून वकील असीम सरोदे यांची टीका

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीला आघाडी मिळाली आहे. यावरून वकील असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आजच्या महापालिका निकालांमुळे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाची आठवण झाली. सर्वात प्रथम एक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला कि राज्यपाल भगतसिंग यांनी बहुमत चाचणीसाठी दिलेला आदेश आम्ही थांबवू शकत नाही आणि तेथून ‘भाजपच्या एकनाथ शिंदे’ यांच्या बाजूने न्यायाचा तराजू झुकत गेला. मग सर्वोच्च न्यायालयाच्या पाच नायाधीशांच्या न्यायपीठाने निर्णय दिला तेव्हा निर्णयात लेखी नमुद केले कि, राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा सल्ला नसतांना बहुमत चाचणीचे दिलेले आदेश बेकायदेशीर होते.

नंतर विश्वासाने कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठविले आणि त्यांनी त्या निर्णयाची ठरवून वाट लावली. अश्याप्रकारे अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे पक्षाची वाट मोकळी झाली. व नंतर जल्लोष …… लोकसभा, विधानसभा, नगरपरिषदा व आता महापालिका व पुढे जिल्हा परिषद व पंचायत समिती ….. भाजप चा जल्लोष सुरूच राहील असेही सरोदे म्हणाले.