
मुंबई महापालिका निवडणुकीचा वॉर्ड क्र. 193 चा निकाल जाहीर झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार हेमांगी वरळीकर यांनी मिंधे गटाच्या प्रल्हाद वरळीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल नागवेकर यांचा दारुण पराभव केला.
विजयी झाल्यानंतर हेमांगी वरळीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अपप्रचार करणाऱ्यांना पुरुन उरले. उद्धव साहेबांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला, अशा भावना वरळीकर यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.





























































