स्वागत नव्या पुस्तकांचे

वैचारिक जीवनाच्या वाटा उजळवणाऱ्या दिग्गज विचारवंत, नेते, कवी, लेखक, सेवाभावी कार्यकर्ता यांचे शब्दचित्र रंगवणारे हे पुस्तक. थोर, कर्तगार आणि गुणवंत व्यक्तींच्या गुणांची व कार्याची ओळख करून देणारे हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.

आदर्शाचे प्रकाशदीप

  लेखक : पंढरीनाथ तामोरे

  प्रकाशक शारदा प्रकाशन

  पृष्ठे : 158

  मूल्य : 200 रुपये  

 

श्रीमंती म्हणजे संपत्ती, समृद्धी. ही समृद्धी, श्रीमंती गुणावरून ओळखायची असते, त्या देशाच्या कर्तबगार तरुण पिढीवरून ओळखायची असते. हाच पाठ सांगणाऱ्या, मुलांची वैचारिक श्रीमंती वाढविणाऱ्या या कथा लहान मुलांसाठी.

खरी श्रीमंती

  लेखिका : अरुणा ढेरे

  प्रकाशक : सुरेश एजन्सी

  पृष्ठे : 48

  मूल्य : 80 रुपये  

बंजारा समाजाचा वारसा सांगणाऱ्या या कविता. प्राचीन संस्कृतीचा धागा जोडून ठेवणाऱ्या बंजारा समाजाचे जीवन, त्यांच्या परंपरा, संस्कृती हे जाणून घेतानाच त्यांच्या वंचना, त्यांच्या भावना मांडणारा, त्यांची अभिव्यक्ती दर्शवणारा हा कवितासंग्रह.

बिनबुडाचा इतिहास

कवी : संतोष शर्मा राठोड

प्रकाशक : पेन क्राफ्ट पब्लिकेशन

पृष्ठे : 96

मूल्य : 150 रुपये