
ठाणे महापालिका निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला आहे. आम्ही सोबत किंवा विरोधी असलो तरीही पारदर्शक काम आणि विकास यादृष्टीने आम्ही अंकुश ठेवण्याचे काम करू. आम्ही म्हणू ते धोरण आणि सांगू ते तोरण हे जसे प्रशासकीय राजवटीत व्हायचे ते आम्ही खपवून घेणार नाही. ठाणे पालिकेत वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसू, असा इशारा भाजप आमदार संजय केळकर यांनी दिला आहे.
आमची सत्ता किंवा विरोधी दोन्ही बाजूची तयारी आहे. पक्ष जे आम्हाला सांगेल ते स्वीकारायला तयार आहोत. सरकार असतानाही प्रशासकीय राजवटीत जे जे अयोग्य होते आणि गैर होते त्याविरोधात आम्ही बोलत होतो. ठाण्याचे हित आणि ठाणेकरांचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यासाठी जे काही करायला लागेल ते करू, असे संजय केळकर म्हणाले.






























































