
‘खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे हे मुंबई महापालिकेच्या निकालांनी दाखवून दिले आहे,’ अशी खणखणीत प्रतिक्रिया राज्यसभा खासदार व ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आज दिली.
दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘मुंबई शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांनी दणदणीत यश मिळवले आहे. शिंदे गटापेक्षा खूप जास्त जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे सिद्ध झाले आहे,’ असे सिब्बल म्हणाले. शिंदे-भाजपचे राजकारण आम्हाला मान्य नसल्याचा संदेश लोकांनी दिला आहे, असेही सिब्बल यांनी सांगितले.
शिंदेंना भाजपच्या शिकारीची भीती
निकाल लागताच शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये काsंडून ठेवले आहे. त्याबद्दल विचारले असता, ‘भाजपकडून आपल्या नगरसेवकांची शिकार होण्याची भीती शिंदेंना वाटत असावी. इतर पक्षांकडे शिंदेंचे नगरसेवक पह्डण्याइतकी साधनसामुग्रीच नाही,’ असे सिब्बल म्हणाले.
भाजपचा इतिहासच फोडाफोडीचा
मुंबईतील विजय हा भाजपच्या सकारात्मक राजकारणाचा परिणाम आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याची सिब्बल यांनी खिल्ली उडवली. ‘एकनाथ शिंदेंना त्यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवावे लागले आहेत. त्यामुळे हे पॉझिटिव्ह पॉलिटिक्स आहे का याबद्दल तेच सांगू शकतील, असे सिब्बल म्हणाले.
भाजपसोबत गेलात की संपलात!
‘मित्रपक्षांना संपवणे ही भाजपची छुपी राजकीय रणनीती आहे. जिथे सत्ता नाही किंवा ताकद नाही तिथे भाजप प्रादेशिक पक्षांशी युती करायची, सत्ता मिळवायची आणि नंतर आधार देणाऱया पक्षालाच संपवायचे. बिहारमध्ये जेडीयूसोबत, हरयाणात इंडियन नॅशनल लोकदलासोबत त्यांनी हेच केले. ताजे उदाहरण मुंबईचे आहे. त्यामुळे छोटय़ा पक्षांनी भाजपपासून दूरच राहावे. भाजपसोबत गेलात की संपलात म्हणून समजा,’ असा इशारा सिब्बल यांनी दिला.
भाजपनं नेहमीच फोडाफोडीचं राजकारण केलंय. त्यांचा हा इतिहास स्वातंत्र्यकाळापासूनचा आहे. स्वातंत्र्य आंदोलनातही त्यांनी महात्मा गांधी यांना कधी सहकार्य केलं नव्हतं.’


























































