
डावखुरा सलामीवीर अथर्व तायडेच्या शतकी खेळीच्या जोरावर विदर्भाने प्रथमच विजय हजारे करंडक जिंकत इतिहास घडवला. अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रचा 38 धावांनी पराभव केला.
सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर अथर्व तायडे आणि अमन मोखाडे यांनी 80 धावांची भक्कम सलामी दिली. मोखाडे स्पर्धेत एकूण 814 धावा करून अव्वल राहिला, त्यानंतर तायडे आणि यश राठोड यांनी डाव सावरत संघाला 2 बाद 213 पर्यंत नेले. तायडेने 97 चेंडूंत 15 चौकार व तीन षटकारांसह दर्जेदार शतक पूर्ण केले. मात्र त्यांच्या विकेटनंतर विदर्भाचा डाव गडगडला आणि संघ 50 षटकांत 8 बाद 317 इतक्याच धावांपर्यंत मजल मारू शकले. सौराष्ट्रकडून अंकुर पनवारने 65 धावांत 4 विकेट टिपले. 318 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्रची सुरुवातच ढासळली. हार्विक देसाई, विश्वराजसिंह जाडेजा आणि समर गज्जर लवकर बाद झाल्याने दबाव वाढला.

























































