
मध्य रेल्वेची मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) मंगळवारी रात्री साडेतीन तास बंद राहणार आहे. डिस्क डीफ्रॅगमेंटेशन आणि प्रणाली पॅरामीटर टय़ुनिंगसाठी रात्री 11.45 ते पहाटे 3.15 वाजेपर्यंत मुंबई पीआरएसची सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत प्रवासी आरक्षण प्रणाली, कोचिंग परतावा, चार्टिंग संबंधित कामकाज, गाडी फायरिंग, आयव्हीआरएस, चालू आरक्षण, चार्ट प्रदर्शन, टच स्क्रीन, परतावा काउंटर या सुविधा उपलब्ध नसतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. मुंबई पीआरएसअंतर्गत येणाऱया गाडय़ांचे इंटरनेटद्वारे तिकीट आरक्षण उपलब्ध राहणार नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

























































